काकडगाव
काकडगाव ही ग्रामपंचायत नाशिक जिल्ह्यातील बागलाण पंचायत समिती अंतर्गत येते. हे आदिवासी क्षेत्र असून गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. ग्रामपंचायतीत विविध विकासात्मक उपक्रम सातत्याने राबविले जातात. ग्रामसभेचे आयोजन नियमित केले जाते व ग्रामस्थांचा सहभाग सक्रिय असतो. जलजीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान, जलसंधारण व वृक्षलागवड यांसारखे उपक्रम प्राधान्याने राबवले जातात. शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचावा यासाठी ई-गव्हर्नन्स, ऑनलाइन दाखले व तक्रार नोंदणी सुविधा उपलब्ध आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, स्ट्रीटलाईट, शाळा-अंगणवाडी सुधारणा तसेच महिला स्वयं-सहाय्यता गट व युवकांच्या कौशल्यविकासाला विशेष प्रोत्साहन दिले जाते.




